Saturday, December 25, 2021

2021 कवितांचा संग्रह

 

धुक्यातहरवला

गंगाकाठ  गंगेचा

परिसर निवांत निश्चल

आनंद गंगा दशॅनाचा

 

दत्तप्रभुंचा महिमा

विलक्षण नित्य पुजन

होते श्रध्देने वास्तू त

शांती समृद्धी समाधान

 

पहाट  गारवा

 गंध मारव्याचा

मंदिरात  घुमतो

स्वर काकडआरतीचा

 

रम्य स्मृती

साहित्य संमेलनाच्या

उत्साहाने झाले साजरे

 आतषबाजीने शब्दांच्या

 

सजनाच्या साथीला

साजनी आली  नासिकला

  कोसळताना पाऊस  पाहुनी

    स्फुरली कविता   तिला

 

 

 

गोकणॅ फुलांची

रांगोळी भारी

 भल्या पहाटे

  सजले अंगण भारी

 

सुयोंदय दिसतो देखणा

जगंनियत्याची अनोखी अदाकारी

 आभाळी पसरली लाली

दृश्य मजला दिसले भारी

 

किलबिल पाखरांची

 अंगणी चाहुल

हलक्या पावलाने

 माय माऊली घेते दखल

 

रंगरंगाची दुनिया मनोहर

 अंगणी फुलांचा बहर

 सुप्रभातीचा आनंद   विलक्षण

   अवघ्या परिसरात आनंदाला बहर

 

मंद झुळूक ती रम्य सकाळी

आसमंत दरवळे सारा

बालगोपालांची लगबग

पाहण्या निसर्गाचा अविष्कार सारा

 

 

 

चैतन्यमयी  सकाळ  

 गारवा आहे वातावरणात

शेकोटीची ऊब भारी

 तन मन   माझे प्रफ्फुलित

 

मस्त गारवा सकाळी  सकाळी

      बुचाची फुले पसरली

       ईथे तिथे  गरम ऊबदार

        शाल लपेटून मंडळी फिरायला निघाली

 

पहाटे च्या प्र हरी

अभ्यंगस्नान

  तन मन मोहरेल

 आनंदाचे वातावरण

 

आनंदाची दिवाळी

आली घरोघरी

  माहेर वाशिनी

 आल्या माहेरी

 

अंगणी माझ्या

प्रकाशला चंद्र नभीचा

 तेज तयाचे पाहुनी

   महापुर आनंदाचा

 

 

असा बेधुंद पाऊस

भिजवून चिंब करतो

छत्रीला झुगारून

स्मृतींना उजाळा देतो

 

बरसतोय बेधुंद पाऊस

वेळी अवेळी

 निसर्गाच्या कोपाने

 हतबल शेतकरी  वेळोवेळी

 

हसतमुख गृहिणी

दिसे जिथे   तिथे

लक्ष्मीचा  सदैव

  वरदहस्त तेथे

 

प्रभातीची किरणे

   जयांच्या अंगणी

 प्रत्येक क्षण आनंदाचा

 साजरा करते गृहिणी

 

शोधिशी  मानवा

राऊळी मंदिरी

 आतॅ साद रफीजींची

 अजुनी घुमते अंतरी

 

रम्यआठवणी  

    साहित्य विश्वाच्या

 श्रावण साजरा

      आतषबाजीने  शब्दांच्या 

 

लेखणीतून झाले

व्यक्त भक्त गण

 नाही वारी साकारले

 रूप मनमंदिरातुन

 

मंद मंद पावलांनी

आली झुळूक सुगंधाची

सकाळ झाली प्रसन

  अंगणी  पखरण पारिजातकाची

 

शुभ कार्याचा प्रार॔भ

करण्या स्तवन  करावे

गणरायाचे  कायॅ सिध्दिस

  जाईल विश्वास मनी धरावा

 

लेखणी साहित्यीकांची

    देते समाजाला आकार

     अशांत मनास   मनःशांती

      देण्या  सदैव तप्तर

   

पांडुरंगास साद

आनंद मावेना तो

  गगनात  श्री हरीचे

 नामस्मरण मनामनात

 

सकाळ होते निंवात 

आनंद क्षणाचा  निमॅळ

आठवणीदाटतात

 लेखणीतुन  उमटती शब्द निमॅळ

 

हाती लेखणीघेता

मन माझे रमते

शब्दांच्यादुनियेत

हरवून जाते  साहित्याच्या विश्वात

 

किलबिल पाखरांची

कानी येता प्रभातीच्या

मधुर स्वरांनी  उमटल्या

लहरी   सदनी  माझ्या आनंदाच्या

 

लिलीच्या रंगाची

 किमया  भारी 

 पाकळी पाकळीतुनी

  एकवटले सोंदयॅ सारे

 

वाळल्यातृणावरी

भल्या सकाळी

  राजा वनीचा खाद्य एकलाच

शोधतसे रानोमाळी

 

 

दाटुन आले मेघ

नभी नयन

आतुरघेण्या दशॅन

भास्करा तूझे मनापासून

 

विजेचा खेळ

रंगला आकाशी

 भास्कराचे आगमन

पाहुनी   सृष्टी आनंदली मनाशी

 

निसर्गाचे देणे

अदभुत रंग मनोहर

 सुग॔धाचा दरवळ

 आसमंतात  पसरतो मधुर

 

नभी रवी दशॅन

आसमंतात दरवळे

मधुर सुवास   परिसरात

 कोकिळ गाते   प्रसन्न ती सकाळ

 

रांगोळी  दाखवी

संस्काराची परंपरा

 महिलाशक्ती च्या

  कार्यशक्तीचा अविष्कार

 

 

 

मैत्री जीवाभावाची

लाभता साथसखीची

 संकटकाळी दुःख मनाचे

करते हलके  सखी खरी तीच

 

नभी ऊगवला रवीराजा

घेता दशॅन आंनंद मनीचा

प्रभा फाकली सवॅदुर

पक्षी गाती सुर आनंदाचा

 

रंगाचीदुनिया भारी

 मधुर सुगंधाची

साथसंगत  भारी

ईश्वरचरणी   भेट प्रेमाची

 

पंढरीचा विठोबा

स्वप्नात आला

घरात काकडआरतीचा

 माहोल घेऊन आला

 

रिमझिम  पावसाचे

थेंब थेंब पडता    तरूवरी

 भिजुनी चिंब झाली रानपाखरं

   स्वर मधुर उमटती    वृक्षवेलीवरी

 

 

 

बरसतील सरींवर सरी

आषाढाच्या  रूप देखणे

 पाहुनी धरतीचे   

  सजग होईल ते कविमन

 

गॅलरीत  फुलतो

गोकणॅ जेंव्हा

  ईश्वरचरणी प्रार्थना

 स्विकार  मनापासून व्हावा

 

लेखनीचे महत्व भारी

 मनीचे बोल  लेखनी

देते  समाजाला आकार

  संतुष्ट मी मनोमनी

 

तिस-या सोमवारचे

महत्व आहे त्रयबंकेशवरी

भक्तगण आतुर  बिलवपत्र

   अपॅण करण्या शिवावरी  

 

घाटातुनी वळणावळणाची

वाट हिरवाई चा आनंद

विलक्षण   नतॅन जलधारांचे

   निसर्गाशी  मनींचा संवाद

 

 

 

नित्य नवा दिवस

नित्यनवा विचार

 नित्य नवी आशा

  आयुष्य करील सुकर

 

देखणे रूप

बालगणेशाचे

करिती स्तवन

प्रथम  गणेशाचे

 

चाहुल स्वागताची

रविराजाच्या  किरणांची

बरसात  नभातुनी

 तरूवेलींची तयारी आगमनाची

 

तो चंद्र गगनी

सवे धवल चांदणी

 मनमोहक मधुर हास्य

शीतल छाया अंगणी.....

 

नभांगणी किलबिल पाखरांची

जाग आली चराचराला

सुयॅ नारायणाच्या आगमनाची

    चाहुल सा-या विश्वाला

 

 

 

 

शब्द मम जीवन साथी

नाही जवळचे मज कोणी।

साथ संगत अनंतकाळाची

आनंद लहरी उठती देहातूनी॥

 

निखळ आनंद तो

बालपणीचा

आकाशाच्या निळाईचा

आज भासे विरह निसर्गाचा

 

कविता सदैव माझी सखी

 सकाळ फुलते ऊमलते

 लेखनीतुन  प्रेरणा तिची

 साथ संगत  मजला करते

 

युगानुयुगे आहे ऊभी

        विठठलासंगे  रूखमाई

           पाहुनी तिचे रूप

          वाटते साक्षात  आपुली आई

 

देखणी नार

नटखट  बेधुंद

पावसाच्या सरी

करती तिला धुंद

 

 

वाट पाहते ती

बेधुंद पावसात

भिजलेली  ती

 खुष आनंदात

 

तो चंद्र गगनी

सवे धवल चांदणी

 मनमोहक मधुर हास्य

शीतल छाया अंगणी

 

नभांगणी किलबिल पाखरांची

जाग आली चराचराला

सुयॅ नारायणाच्या आगमनाची

    चाहुल सा-या विश्वाला

 

शब्द मम जीवन साथी

नाही जवळचे मज कोणी।

साथ संगत अनंतकाळाची

आनंद लहरी उठती देहातूनी॥

 

निखळ आनंद तो

बालपणीचा

आकाशाच्या निळाईचा

आज भासे विरह निसर्गाचा

 

 

 

कविता सदैव माझी सखी

 सकाळ फुलते ऊमलते

 लेखनीतुन  प्रेरणा तिची

 साथ संगत  मजला करते

 

युगानुयुगे आहे ऊभी

        विठठलासंगे  रूखमाई

           पाहुनी तिचे रूप

          वाटते साक्षात  आपुली आई

 

देखणी नार

नटखट  बेधुंद

पावसाच्या सरी

करती तिला धुंद

 

वृक्षवेलींचे सान्निध्य

   आरोग्य संपन्न  करते

  भारतीय संस्कृती वड

 ओंदुबर पिंपळाचे पुजन करते

 

धरती झाली

बापुडवाणी

आकाशीची निळाई

भासे उदासवाणी

 

 

 

 

दाट दाट  धुके

वाट नागमोडी वळणाची

 पहाटवेळ  ती रम्य

 साथ  संगत  मस्त निसर्गाची

 

 

धन्यवाद!!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2021 कवितांचा संग्रह

  धुक्यातहरवला गंगाकाठ   गंगेचा परिसर निवांत निश्चल आनंद गंगा दशॅनाचा   दत्तप्रभुंचा महिमा विलक्षण नित्य पुजन होते श्रध्देने व...